दिनेश दुखंडे झी मीडिया, जालना : 'समृद्धीचा रिअॅलिटी चेक'मध्ये आज परिस्थिती जालन्यातल्या जामवाडीची... इथं शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला असलेला विरोध मावळलाय, पण जमिनीच्या दरावरून तंटा सुरुच आहे.


सरकारसोबत वाटाघाटी सुरुच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना शहरालगतच असलेलं गाव जामवाडी... शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचा प्रभाव असलेला हा भाग... गावात प्रवेश केल्यावर त्याचा अनुभव येतो... या गावातल्या जवळपास 15 शेतकऱ्यांची एकूण 37 एकर जमीन जमीन समृद्धी महामार्गात जातेय. पूर्वी शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध होता, पण जमिनीला चांगला मोबदला मिळणार हे आसपासच्या गावात सुरु आलेल्या व्यवहारातून लक्षात आल्यानं तो मावळला. गावात गांधीजींची तीन माकडं पाहायला मिळतात, पण जमीन मोबदल्याच्या दरावरून इथं सरकारसोबत सुरु असलेला तंटाही पाहायला मिळतो.


शेतकऱ्यांपुढे राजकीय पेच


इथं शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातला राजकीय संघर्ष जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर सध्या खोतकरांनी जालन्यात तयारी सुरु केलीय. त्यामुळे दाद मागावी तरी कुणाकडे? हा मोठा पेच शेतकऱ्यापुढे आहे.


आधीच दुष्काळामुळे पाण्याच्या प्रश्नानं होरपळून निघालेलं हे गाव... या गावात आज शेतकरी कुटुंबातली जवळपास 50 मुलं लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. पण शेतकरी म्हणून कुणी मुलगी देईना, अशीही इथली परिस्थिती आहे... त्यामुळे समृद्धी महामहार्गामुळे गावात येणारी समृद्धी, हीच काय ती एकमेव अपेक्षा मानली जातेय... शेतकरी त्या समृद्धीची आस लावून बसलाय...