.. म्हणून कडाडले भाज्यांंचे दर
राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून, त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतक-यांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता 525 गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय
मुंंबई : राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून, त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतक-यांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता 525 गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय