मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय; बड्या राजकीय नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले असताना एका बड्या ओबीसी नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे या वादात भर पडणार आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय असे मोठं विधान ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. संघर्ष टाळण्यासाठी मराठा समाजानं आरक्षण वाढवून घ्यावं किंवा EWS चा लाभ घ्यावा असा सल्ला देखील शेंगडें यांनी दिला आहे.
'मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय' असं मोठं वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलंय. मराठा समाज मागास नाही, असं कोर्टानंही म्हटलंय. मराठा समाजानं EWSमधून किंवा वाढवून आरक्षण घ्यावं, म्हणजे मराठा-ओबीसी वाद संपेल, असं शेंडगे यांचे म्हणण आहे.
सरसकट मराठा आरक्षणाला विरोध करण्यावरुन छगन भुजबळांविरोधात सर्वपक्षीय मराठा नेते एकवटलेले असताना..भुजबळांना ओबीसी नेत्यांचं समर्थन वाढलंय. राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलं. या बैठकीत आमदार प्रकाश शेंडगे, प्राध्यापक टी.पी.मुंडे, जे.डी.तांडेल, लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते. भुजबळांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी थेट देशभरातल्या ओबीसी नेत्यांना साद घातलीय..
तर, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देतील ते सत्तेबाहेर जातील असा खणखणीत इशारा यापूर्वीच छगन भुजबळांनी सरकारला दिलाय. ओबीसी आरक्षणाबद्दल भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी समर्थन केलंय.