बारामती : बारामती येथील संघवी रेसिडन्सी येथे तृथीय पंथियांनी ध्वाजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. समाजातिलच घटक असलेल्या पण अनेकदा सर्वांच्या दूर्लक्षाचा भाग ठरलेल्या मंडळींनीही ध्वजारोहण केले, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा ७१वा स्वातंत्र्यादिन कालच्या मंगळवारी मोठ्या उत्साहात देशभर साजरा झाला. पंतप्रधानांपासून ते गावच्या सरपंचापर्यंत आणि शाळा कॉलेजच्या प्राचार्यांपासून ते विविध संस्थांच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी ध्वाजारोहण केले. त्याच्या बातम्याही झाल्या. मात्र, याच दिवशी समाजातिलच घटक असलेल्या पण अनेकदा सर्वांच्या दूर्लक्षाचा भाग ठरलेल्या काही मंडळींनीही ध्वजारोहण केले. बारामती येथील संघवी रेसिडन्सी येथे तृथीय पंथियांनी ध्वाजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठाण संचलीत वसुंधरा वाहिनी समुदायाचे सदस्य तसेच, हवाई दलाचे निवृत्त अधिकारी मच्छिंद्रनाथ म्हेत्रे आणि वसुंधरा वाहिनीचे केंद्रप्रमुख युवराज जाधव यांच्या पुढाकाराने हा हा कार्यक्रम पार पडला. निशा पवार व राणी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.


यावेळी बोलाताना, 'आम्हाला घाबरू नका आम्हीही तुमच्या सारखेच आहोत. आमच्याशी चांगला संवाद साधला तर आम्हीही आपल्याशी चांगले वर्तन करू. समाजामध्ये आमचा अपमान झाला तर आमची चीडचीड होते, त्यामुळे आमच्या बद्दल गैरसमज करून न घेता आम्हाला चांगली वागणूक दिली तर आम्हालाही आपल्यासारखा समानतेचा दर्जा मिळेल ',अशी भावना राणी पाटील यांनी व्यक्त केली.


स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यावेळी गृहिणी व सामान्य महिलांना ध्वजवंदनामध्ये सहभागी व्हायला मिळावे या उद्देश्याने तिन वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरूवात झाली. दरम्यान, या आधी दोन वेळा झालेल्या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी ध्वजारोहण केले. मात्र,  देशामध्ये समतेची भावना दृढ करण्याच्या हेतुने यंदाच्या या उपक्रमात तृतीय पंथियांना आमंत्रित करण्यात आले होते. 


या कार्यक्रमास, राजश्री नेवसे, सदानंद करंदीकर, स्नेहल कदम, प्रशांत नेवसे व प्राजक्ता कुलकर्णी, अमोल गोजे यांच्यासह परिसरातील, महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.