प्रणव पोळेकर, झी मिडिया, रत्नागिरी : सध्या अनेकजण व्हेकेशन मोडवर(Vacation mode) आहेत. कोकणातही पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळे(Ganpatipune) हे पर्यटकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. यामुळे मोठ्या संख्यने पर्यटक गणपतीपुळ्याला येत असतात. बाप्पाचे दर्शन घेतल्यावर पर्यटक थेट समुद्र किनारा(Ganpatipune sea) गाठतात. मात्र, समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना खबरदारी न घेतल्यामुळे बऱ्याचदा पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. गणपती पुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक नागरीकांच्या सतर्कतेमुळे गणपतीपुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांचा जीव वाचला आहे. हे दोन्ही पर्यटक कोल्हापुरचे रहिवासी आहेत.   


ऋषाली रनवारे आणि योगेश रनवारे अशी या पर्यटकांची नावे आहेत. ते कोल्हापुरमधून रत्नागिरीत गणपतीपुळेच्या दर्शनासाठी आले होते. 


पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले


गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे दोघे पर्यटक समुद्र किनाऱ्यावर गेले होते. समुद्रात पोहण्याचा मोह यांना आवरला नाही. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. या दोघांना बुडताना पाहून मोरया वॉटर स्पोर्टसच्या सदस्यांनी या दोघांना वाचवले.  यांच्या सतर्कतेमुळे या दोघांचा जीव बचावला आहे. 


गणपतीपुळे समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजलेला 


गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने असतात. या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असतात. खोल समुद्रात न जाण्याच्या सुचना पर्यटकांना करण्यात येतात. मात्र, तरी देखील पर्यटक सूचनांकडे दुर्लक्ष करुन समुद्राच्या पाण्यात जातात. त्यामुळे नेहमीच अश प्रकारच्या घटना येथे घडत असतात.