माधव चंदनकर, गोदिया : प्रेमाचं प्रतिक सारस... पूर्व विदर्भाची शान सारस... याच सारसांची गणना केली जातेय... अचूक शास्त्रीय गणनेसाठी सुमारे ६० सारसप्रेमी गोंदिया भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यात भल्या पहाटेच कामाला लागतायत....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारस...लाल मानेचा, टोकदार चोचीचा, लांबसडक पायांचा, डौलात चालणारा आणि सर्वात मोठा उडणारा पक्षी... हा सारस राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळतो. त्यामुळं त्याचं संवर्धन होणं,  त्याची संख्या वाढवण्यासाठी त्याची गणना होणेही महत्त्वाचे... त्याचीच लगबग गोंदिया, भंडारा आणि शेजारच्या राज्यातल्या बालाघाट जिल्ह्यात सुरूय. शास्त्रीय पद्धतीनं सारसांची गणना केली जातेय. सुर्योदयापूर्वीच सारसांचा अधिवास असणारी ठिकाणं निवडली जातात. एकट्या गोंदिया जिल्ह्यात सुमारे ६० सारसप्रेमी आहेत. १० ते १५ तून सारसांची गणना केली जाणारय. गेल्यावर्षी सारसांची संख्या ८२ होती. 



एका सारसाचा मृत्यू झाला की दुसरा सारसही मृत्युला कवटाळतो त्यामुळं आज सारसांच्या संवर्धनाची गरज आहे. यासाठी तरुणही मोठ्या संख्येनं पुढं येतायत. एक काळ असा होता जेव्हा फार कमी सारस पक्षी गोंदियात होत. पण गैरसरकारी संस्था, पक्षी प्रेमींनी पुढाकार घेऊन केलल्या कामामुळे संख्या वाढण्यात मदतच झाली.