परतीच्या पावसाने रायगडात भातशेतीचे मोठे नुकसान...
गेले 2 दिवस सुरू झालेल्या सततच्या पावसाने रायगड जिल्हयात भातशेतीचं मोठे नुकसान झाले आहे.
रायगड : गेले 2 दिवस सुरू झालेल्या सततच्या पावसाने रायगड जिल्हयात भातशेतीचं मोठे नुकसान झाले आहे. वादळी वा-यासह पावसाने भात शेतीला अक्षरश: झोडपून काढलं असून कापणीसाठी आलेलं भाताचं पीक शेतात आडवं झालं आहे.
शेतात पावसाचं पाणी साचल्यामुळे भात सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचं उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा रायगड जिल्हयात 1 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली असून समाधानकारक पावसामुळं शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र या पावसामुळं सगळं शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय.
आता भिजलेले पीक झोडून ते सुकवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. पावसाचा अंदाज घेऊन शेतक-यांनी भाताची कापणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.