अलिबाग : आपल्‍या वि‍विध मागण्‍यांच्‍या पूर्ततेसाठी रायगड जिल्‍हयातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले. जिल्‍हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसील मंडल अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.  त्‍यामुळे एरव्‍ही गजबजलेल्‍या सरकारी कार्यालयांमध्‍ये आज शुकशुकाट पहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायब तहसिलदारांची वेतनश्रेणी वाढवण्‍यात यावी, महसूल लिपीकाचे पदनाम महसूल सहायक असे करावे, इतर विभागांसाठी नवीन आकृतीबंध तयार करावा, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत शासनाने वेळोवेळी आश्वासन देवूनही कार्यवाही झाली नसल्याने आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे.