मुंबई : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करत त्यांनी सांगितलं, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझी प्रकृती आता उत्तम आहे.' सावधानता म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याचं देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत.


दरम्यान कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सांगत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या लोकांना देखील कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.