रिक्षा-एसटी अपघात : मृतांचा आकडा ११ वर, २० पेक्षा जास्त जखमी
मालेगावात एसटी आणि रिक्षाचा विचित्र अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे.
नाशिक : मालेगावात एसटी आणि रिक्षाचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कठडा तोडून विहिरीत कोसळलीत. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने शेतात गेलीत आणि अपघातात दोन्ही वाहने विहिरीत पडलीत. या विचित्र अपघातात ११ जण ठार झालेत. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहे. विहिरीतून जखमी आणि मृत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी एसटीचा पत्रा कापावा लागला. दरम्यान, एसटीच्या आधी रिक्षा विहिरीत कोसळल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. बस आणि रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी विहिरीत अडकले आहेत. तर बसमधील अनेक प्रवासी अडकलेत. काहींना बाहेर काढण्यात यश आले तरी अनेक प्रवासी विहिरीत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले. तर आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींवर मालेगांवच्या सामान्य रुग्णालय आणि देवळाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.