कोकणातील पावसाचा कहर सुरुच, महाडमधील 32 घरावंर दरड कोसळली
मुसळधार पावसाचा हाहाकार: महाडमध्ये 32 घरांवर दरड कोसळली
रायगड: राज्यात एकीकडे मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. मुंबई-ठाणे पालघर रायगडसह तळकोकणात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुठे दरड कोसळतायत तर कुठे अख्खी गावं पाण्याखाली जात आहेत. अशाच भीषण परिस्थितीत एक मोठी बातमी रायगडच्या महाड तालुक्यातून हाती येत आहे.
महाड तालुक्यात नाते रोडवर तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शंका आहे. दऱड कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि बचावकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नेटवर्क येत नाही. त्यामुळे संपर्क करण्यात अडचणी येत आहेत. पाच ते सहा रेस्क्यू टीम आहेत. पालघरमध्ये मुसळधार पावासानं थैमान घातलं आहे. अनेक भागांमध्ये जलप्रलय आला आहे. तर घरांवर दरड कोसळल्यानं अनेक जण बेपत्ता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमी किंवा जीवित हानीची अद्याप माहिती नाही.