Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या अनेक महामार्गांपैकी एक असणाऱ्या समृद्धी महामार्गाबाबतच्या अनेक बातम्या दर दिवसाआड पाहायला मिळाल्या आहेत. महत्त्वाच्या शहरांना जोडत आणि प्रवासाची वेळ कमी करतस साकारल्या गेलेल्या महामार्गानं वाहनधारकांना मोठा दिलासा दिला असला तरीही हाच समृद्धी महामार्ग काहींसाठी मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये लोकार्पण झाल्या दिवसापासून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या महामार्गावर तब्बल 39 जणांनी अपघातात जीव गमावला तर, 143 जण विविध अपघातांमध्ये जखमी झाले. माध्यमांना संबोधत पोलीस अधिकाऱ्यांनी वरील माहिती दिली. यावेळी अपघातांचं मुख्य कारणाचा ओझरता उल्लेखही त्यांच्या बोलण्यातून झाला. 


रोड हिप्नोटिझम हे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं कारण असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. Road hypnosis हे व्हाईट लाईन फिव्हर म्हणूनही ओळखलं जातं. ही एक मानसिक स्थिती असल्याची बाब इथं लक्षात घ्यावी. 


Road hypnosis म्हणजे काय? 


रस्ते संमोहन अशी याची शब्दश: व्याख्या होते. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते सातत्यानं दोन- अडीच तास वाहन चालवल्यानंतर ही परिस्थिती उदभवू शकते. याचा थेट परिणाम Unsonscious Mind वर दिसून येतो. जिथं चालकाचं लक्ष विचलित होऊन पूर्णपणे दुसऱ्याच कोणत्याही गोष्टीवर केंद्रीत होतं आणि त्याची Unsonscious Mind वरील पकड आणखी घट्ट होते. परिणामी मेंदूला कोणताही सतर्क करणारा संदेश मिळत नाही. मेंदू पूर्णपणे निष्क्रीय होतो पण, शारीरिक क्रीया मात्र सुरु असतात. 


हेसुद्धा वाचा : Video : 'मला इथे राहायचंच नाहीये'; आधी केस कापले आणि आता असं का म्हणतेय बॉलिवूड अभिनेत्री? 


डोळ्यांनी दिसतंय पण, मेंदूला ते कळतच नाहीये कारण त्याला सतर्क होता येत नाहीये. अशा परिस्थितीच चालक त्याची विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. अखेर 120 ते 140 किमी प्रतीतास इतक्या वेगावर असणारी वाहनं अचानकच अपघाताला बळी पडतात. ही परिस्थिती रोड हिप्नोसिस म्हणून ओळखली जाते. त्यामुळं वाहन चालवताना दोन किंवा त्याहून अधिक तासांचा प्रवास असल्यास मध्येमध्ये काही काळ थांबा, किंवा Road hypnosis, तत्सम प्रकार जाणवू लागल्यास वाहन थांबवा. 


समृद्धी महामार्गावर आतापर्यंत काय घडलं? 


11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाची उदघाटन केलं. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उदघाटन झाल्यानंतर हा मार्ग प्रवासासाठी मोकळा झाला. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या 701 किमी महामार्गाचं नाव असून, नागपूर ते मुंबईदरम्यानच्या प्रवासाचं अंतर कमी करणं हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.