मुंबई : कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा निव़डणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि ही निवडणूक जिंकलेल्या राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सर्वांचं लक्ष वेधलं. माध्यमांशी संवाद साधण्यापासून ते अगदी मतदार संघातील पराभूत उमेदवाराप्रती असणारा आदर पाहता त्यांचा वावर हा फक्त मतदारांचीच नव्हे, तर विरोधकांचीही मनं जिंकून गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतक्यावरच न थांबता रोहित पवार यांनी मुंबईच्या वरळी मतदर संघातून विजयी झालेल्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना दुरध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या. आजपर्यंत सत्तेसाठी लढणाऱ्या पक्षावा वाट दाखवणाऱ्या ठाकरे कुटुंबातून एकाही व्य्कतीने निवडणूक लढली नव्हती. पण, आदित्य ठाकरेंनी एक नवी सुरुवात करत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि यात यशस्वीसुद्धा झाले. 


आदित्य यांच्या वाट्याला आलेल्या याच यशासाठी त्यांच्यावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये रोहित पवारही मागे राहिले नाहीत. एक सच्चा राजकारणी आणि दोन्ही कुटुंबांमध्ये असणारे राजकीय आणि एकंदरच कौटुंबीक संबंध पाहता रोहित यांनी आदित्य ठाकरेंना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्याचं कळत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रोहित यांनाही विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.  


पराभवानंतर ही राम शिंदेंनी रोहित पवारांना विजयी फेटा बांधून जिंकलं अनेकांचं मन


 


करे आणि पवार घराण्यातील ही नवी पिढी आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाली आहे. इतकच नव्हे तर, येत्या काळात ही मंडळी या नव्या विश्वात कशी कामगिरी करतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास सत्तास्थापनेच्या गणितांचा अंदाज घेता आगामी वाटचालीसाठी हे दोनही युवा नेते आणि विजयी उमेदवार त्यांच्या परिनेही काही प्रयत्न करत असतील हे खरं.