Rohit Pawar On NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज ट्विटरवर प्रश्नोत्तराचा क्लास घेतला. त्यावेळी रोहित पवार यांनी नेटकऱ्यांच्या प्रश्नाची रोखठोक उत्तरं दिली. रोहित पवार यांना भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो? असा सवाल रोहित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यानी गडकरी साहेब म्हणत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव घेतलं. साहेब, दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.


Rohit Pawar यांची भेधडक उत्तरं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्याकडून कामाची प्रेरणा मिळते असे आपण सांगता. मात्र, कुटुंबातीलच अशा नेत्यांसोबत काम करताना कधी मनावर दडपण येते का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलंय. सामान्य लोक साहेबांच्या धोरणांबाबत अंदाज बांधू शकतात. मात्र राजकीय लोकांनी साहेबांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये.
दडपण येतं! साहेबांसारखी लेगसी असेल तर नक्कीच येतं, असं रोहित पवार म्हणतात.


रोहित पवार लग्न कधी करणार?


तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा सवाल एका युझरने विचारला होता. त्यावर रोहित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. हा प्रश्न तुमच्याबद्दल होता की माझ्याबद्दल? चुकून असा प्रश्न मला विचारून माझ्या अडचणीत का वाढ करता?  पंधरा वर्षांपूर्वी विचारलं असतं तर उत्तर देऊ शकलो असतो, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.



आवडी सिरीज कोणती?


दरम्यान, दादा तुमच्याकडे Netflix आहे का ? आणि असेल तर आवडती वेब सिरीज कोणती ? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवार म्हणतात. House of Cards, असं उत्तर दिलं. कधी कधी डोकं शांत करायला OTT platform ची मदत घ्यावी लागते, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या  अध्यक्षपदी बसल्यानंतर  पवार साहेबांचा एखादा मोलाचा सल्ला भेटला का? या प्रश्नावर क्रिकेटमधे राजकारण आणू नको.. आणि व्याप्ती एवढी वाढव की जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देता येईल. निवडक हिरे पुढे आणता येतील जे केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नेतृत्व करतील, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.