आमदार रोहित पवारांची एन्ट्री आणि माहोलच बदलला, पाहा व्हिडीओ
रोहित पावर यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरुन बॅटिंगही केली. यावेळी ते मनसोक्त खेळताना दिसले. कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने सिनथडी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे.
लैलेश बरगजे, झी 24 तास : नेहमी राजकीय वक्तव्य किंवा सभा मतदार संघात दिसणाऱ्या रोहित पावर यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. रोहित पावर कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चुलीवर धापाटे करण्याचा आनंद लुटला आहे.
रोहित पावर यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरुन बॅटिंगही केली. यावेळी ते मनसोक्त खेळताना दिसले. कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने सिनथडी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. यात महिला बचत गटांसह इतरही 100 स्टॉल लावण्यात आले आहेत.
सोबतच युवकांसाठी क्रिकेटचे सामान्यांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. या यात्रेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी एका स्टॉल वरील आजीबाई ची गप्पा मारत धपाट्याची रेसिपी विचारली आणि स्वतः चुलीवर धापाटे देखील बनवलं आहे.
यशस्वी उद्योजक ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या रोहित पवार आता समाजाशी नाळ जोडण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी होऊन नागरिक आणि युवकांचे मन जिंकन्यात यशस्वी होत आहेत.
यासोबत आणखी उत्तम आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आजच डाऊलोड करा Zee 24 taas App
http://onelink.to/xuur2f