सिंहगड : आता रायगड किल्ल्याप्रमाणे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या सिंहगड किल्ल्यावर ' रोप वे ' ने जाता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रोप वे प्रकल्पाचा विस्तृत आराखडा अंतिम टप्प्यात असून या वर्षाच्या अखेरीस रोप वे च्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे होणार त्रास, उत्साही पर्यटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळत रोप वे ने सिंहगड सहज गाठणे शक्य होणार आहे.


तासाला 100 पर्यटक वाहून नेण्याची रोप वे ची क्षमता असणार आहे. ' सिंहगड रोप वे ' ची एक सुंदर प्रतिकृती मुंबईत ' मॅग्नेटिक महाराष्ट्र '  या गुंतवणूक परिषदमध्ये मांडण्यात आली आहे.