Rule Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार PPF योजनेचे तीन नियम; खातेदारकांवर काय परिणाम होणार?
Rule Change from 1st October: PPF अंतर्गंत तीन प्रमुख योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घ्या.
Rule Change from 1st October: PPF आणि सुकन्या समृद्धि योजनासह एनएससीसह काही स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या नियमांत 1 ऑक्टोबर 2024पासून बदल करण्यात येणार आहे. म्हणजेच फक्त दोन दिवसांतच हे बदल होणार आहेत याचा थेट परिणाम खातेदारकांवर होणार आहे. पीपीएफअंतर्गंत तीन मोठे बदल करण्यात येणार आहेत. जर तुमचंदेखील पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF)अंतर्गंत अकाउंट असेल तर कोणत्या कोणत्या नियमांत बदल झाले आहेत व त्याचा परिणाम कोणावर होऊ शकतो, हे जाणून घ्या.
मागील महिन्यात अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक भविष्य निधी (PPF) संबंधित नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. PPF नियमांत बदल झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 2024पासून ते लागू होणार आहेत. अल्पवयीन मुलांच्या नावावर सुरू करण्यात आलेले PPF खाते, अनेक PPF अकाउंट्स आणि पोस्टाच्या माध्यमातून राष्ट्रीय बचत योजनांतर्गंत अनिवासी भारतीयांचे PPF अकाउंट यासंबंधी आहे.
अल्पवयीनांसाठी PPF अकाउंट
नियामांनुसार, अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या PPF अकाउंटवर पोस्टाचे बचत खात्याचे व्याज तोपर्यंत मिळेत जोपर्यंत मुलगा किंवा मुलगी 15 वर्षांचा होत नाही. अशा खात्यांच्या मुदतपूर्वचे गणित हे त्या तारखेपासून केले जाते ज्या दिवशी अल्पवयीन मुलाचे 18 वर्ष पूर्ण होईल.
एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाउंट्ससाठी नियम
कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा एजन्सी बँकेत गुंतवणूकदाराने निवडलेल्या प्राथमिक PPF खात्यावर योजनेच्या दरानुसार व्याज मिळेल, पण ठेव रक्कम वार्षिक कमाल मर्यादेपेक्षा जास्त नसावी. तसंच, दुसऱ्या खात्त्यात काही रक्कम शिल्लक असल्यास पहिल्या खात्यात ती एकत्रित केली जाईल. मात्र, या खात्यावर व्याज जमा होणार आहे. फक्त प्राथमिक खात्यावर योजनेंतर्गंत व्याज मिळणार आहे. प्राथमिक आणि दुय्यम खात्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर शून्य टक्के व्याज मिळेल.
NRIसाठी पीपीएफ अकाउंट्स
1968च्या PPF योजनेंतर्गंत उघडण्यात आलेल्या सक्रीय PPF खाती असलेली अनिवासी भारतीय NRI साठी. खातेदारांच्या निवासी स्थितीबद्दल फॉर्म H मध्ये चौकशी केली जात नव्हती. आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत POSA मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्याज दर लागू असेल. यानंतर, खात्यावर शून्य टक्के व्याजदराने व्याज मिळण्यास सुरुवात होईल.
पीपीएफ योजनेची काही खास वैशिष्ट्ये
दरम्यान, PPF केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. ही योजना लोकांना लाँग टर्मसाठी चांगला परतावा देतो. याचा मुदतपूर्व कालावधी 15 वर्षांसाठी आहे. मुदत पूर्ण झाल्यानंतर ती आणखी 5-5 वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत कर सवलतीचा लाभ मिळतो. यातून मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही. तसंच, कोणताही भारतीय नागरिक या योजनेंतर्गंत खाते उघडू शकतो. किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि वार्षिक कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.