दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा (Corona In Maharashtra) वेग मंदावला आहे. मात्र कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. या कोरोनाला लोकसहभागातून नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने 'कोरोनामुक्त गाव' (Covid free villages) स्पर्धेची घोषणा केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात काही उत्साही तरुण तसेच संघटना कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गावं लवकर कोरोनामुक्त व्हावीत. या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. (Rural Development Minister Hasan Mushrif has announced the Corona Free Village Competition)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेचं आयोजन प्रत्येत महसूल विभागानिहाय करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना बक्षिस जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये अनुक्रमे 50 लाख, 25 लाख आणि 15 लाख अशी पहिल्या 3 क्रमांकासाठी ही बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली आहेत. यानुसार प्रत्येक 6 महसूली विभागात 3 प्रमाणे राज्यातील एकूण 18 ग्रामपंचायतींना ही बक्षिसं मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण बक्षिसाची रक्कम ही 5 कोटी 40 लाख इतकी आहे. 
  
कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे 


कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस – पंधरा (२५१५) व तीस-चोपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. दरम्यान या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी व्हावे. आपलं गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आपलं योगदान द्याव, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.


संबंधित बातम्या :


एकनाथ खडसे आणि पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


कोरोना कसा आटोक्यात येणार?, निर्बंध शिथिल होताच ओस पडलेली बाजारपेठ गर्दीने गजबजली