नवी दिल्ली : रशिया विरुद्ध युक्रेन संघर्षाचा आजचा पाचवा दिवस आहे. दोन्ही देश वाटाघाटीसाठी चर्चा करत आहेत. हे युद्ध कधी थांबणार याबाबत सध्या संपूर्ण जगाला चिंता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन खाद्यतेलाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. युक्रेनहून येणारी सूर्यफुल तेलाची आयात बंद झाल्यानंतर आता कंपन्यांकडूनही या तेलांची विक्री थांबविण्यात आली. 



या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत सूर्यफुल तेलाची कमतरता जाणवू शकते असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतंय..162 रुपये किलो असलेलं सूर्य फुल तेल दहा रुपयांनी वाढलं आहे.


सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हापूस निर्यातीवर होणार आहे. 1 मार्चपासून एपीएमसीत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होणार आहे. मात्र, या युद्धामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जवळपास 15 लाख पेट्या आखाती देशात पाठवल्या जातात. 


रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. अशा स्थितीत एक भविष्यवाणी समोर आली आहे. हे भाकीत आहे पुतीन हे सगळ्या जगाचे सम्राट होतील असं बल्गेरियाचे प्रसिद्ध वेंगा बाबा यांची ही भविष्यवाणी आहे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार का हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.