औरंगाबादचा `वंडरबॉय`, गणितातला `जिनिअस`
अंकाची दुप्पट करताना एकपासून सुरुवात करून अंतिम उत्तर एकशे चाळीस कोटी म्हणजे पंधरा आकड्यात सांगितल्यानं ऋतुराजच्या नावावर जागतिक विक्रमही झालाय.
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ऋतुराज पवार, गणितातलं वंडरबॉय अशीच त्याची ओळख... अगदी कॅल्क्युलेटरलाही कदाचित वेळ लागेल इतक्या वेगानं ऋतुराज आकडेमोड करतो... अगदी काही सेकंदांमध्ये डोळे मिटून नऊ वर्षाचा हा ऋतुराज आकडेमोड करत भल्याभल्यांना थक्क करतो. फक्त बेरीज वजाबाकीच नाही, तर वर्गही त्याला तोंडपाठ आहेत... अगदी तुमच्या मनातली संख्या त्याला सांगा, त्याचा पाढासुद्दा तो क्षणार्धात करून दाखवतो.
केंद्र सरकारकडून पुरस्कार
अंकाची दुप्पट करताना एकपासून सुरुवात करून अंतिम उत्तर एकशे चाळीस कोटी म्हणजे पंधरा आकड्यात सांगितल्यानं ऋतुराजच्या नावावर जागतिक विक्रमही झालाय. त्याचबरोबर त्याला केंद्र सरकारकडून 'एक्सलन्स इन मॅथेमॅटिक्स' हा पुरस्कारही मिळालाय.
अवघ्या नऊ वर्षांच्या ऋतुराजचं गणितावरचं प्रभुत्व अवाक करणारं आहे... त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...