उस्मानाबाद : अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitle ) हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टवरून केतकी चितळे हिच्यावर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक केली तर, न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
केतकी चितळे हिने केलेल्या पोस्टबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) तसेच अन्य नेत्यांनीही तिच्यावर टीका केलीय. मात्र, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केतकी चितळे हिचे समर्थन केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाभाऊ खोत यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे ( Tulja Bhavani Mandir ) दर्शन घेतल. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, केतकी चितळे हिचा मला अभिमान आहे. ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्वतःची बाजु स्वतः मांडली.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे.