रायगड : सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना टार्गेट केलं आहे. माझ्यावर शेतकरी आंदोलन फोडल्याचा आरोप करणारे शेतकरी नेते त्या रात्रीपर्यंत होते कुठे ? शेतकरी आंदोलन चिघळण्या मागे शेतकरी नेतेच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांना आंदोलनात यश मिळाल्या नंतर झोपलेले शेतकरी नेते जागे झाले आणि आपली किंमत शून्य होणार म्हणून या नेत्यांनी महाराष्ट्र पेटवला. 


राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शेतकऱ्यांचे बळी घेण्याचा प्रयत्न याच शेतकरी नेत्यांनी केल्याचा आरोप पुन्हा एकदा राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे केले केला आहे. आगामी काळात कोकणातील शेतकऱ्याला अधिक बळ देण्याचे काम कृषी विभाग करणार असल्याचे सदाभाऊ यांनी सांगितले.