पुण्याच्या सादियाला कुटुंबाकडे सोपवलं जाण्याची शक्यता
दोन दिवसांच्या चौकशीनंतर पुण्याच्या १८ वर्षीय सादियाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय.
पुणे : दोन दिवसांच्या चौकशीनंतर पुण्याच्या १८ वर्षीय सादियाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय.
काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या सादियाला काल जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सादियाच्या चौकशीत तिची जहाल मतं समोर आली होती.
त्यानंतर शुक्रवारी, पथसंचलन कार्यक्रमात आत्मघातकी हल्ल्याचा कट आखल्याच्या संशयावरुन सादियाला काश्मीरमधून अटक करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी हिचा सुसाइड बॉम्ब म्हणून उपयोग होऊ शकतो असा वायरलेस अलर्ट आईजीपी काश्मीर झोनमधून आल्याचे जेसीपी रविंद्र कदम यांनी सांगितले. आता तिला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे.
२०१५ मध्येही पुणे एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती एटीएसच्या संपर्कात असल्याचा संशय पुणे पोलिसांना होता .यानंतर सादियाची कसून चौकशी करण्यात आली. १२ वी पास नंतर नर्सिंग करणाऱ्या मुलीचे पालक, तज्ञांसोबत एटीएसने काऊंसिलींग केले होते.
आता मात्र, सादिया घरी परतणार असल्याच्या वृत्ताला तिच्या आई-वडिलांनीही दुजोरा दिलाय.
काय होता कट?
संचनलनादरम्यान हल्ला करण्याचा कट होता. काश्मीर पोलीसांनी गुत्पचर विभागाच्या माहितीच्या आधारे या तरुणीला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी सुरू आहे.
इंटेलिजंस एजन्सी आणि काश्मीर पोलिसांनी यासंबंधी अलर्ट जारी केला होताअ. मुलगी आयसीसशी जोडली गेल्याचा संशय आहे. १२ वी पास नंतर नर्सिंग करणाऱ्या मुलीचे पालक, तज्ञांसोबत एटीएसने काऊंसिलींग केले होते.