गणेश मोहळे, वाशिम : ज्या आईवडिलांनी तळ हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली. स्वत: काटकसरीने जगून वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं त्याच वृध्द आई वडfलांची परवड होत असल्याने पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वाशीम पंचायत समिती सभापती रेश्मा गायकवाड यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आईवडीलांना सांभाळावेच लागणार असानारा ठराव मांडला आहे. जो नोकरदार कर्मचारी आई -वडिलांचा सांभाळ करणार नाही. त्यांचा ३० टक्के पगार थेट आईवडिलांच्या खात्यात वळता करणारा ठराव सर्वानुमते पारित झाला आहे.


आई वडिलांना दुःखवणारी मुले शासकीय कर्मचाऱ्यातच बघायला मिळत असल्यानं सभापती या नात्याने तालुक्यातील काही गावांचा दौरा करत असताना माझ्या लक्षात आले. सभापती रेश्मा गायकवाड यांनी  जिल्हा परिषद सर्व साधारण सभेत या संदर्भातला एक क्रांतीकारी ठराव मांडला आणि त्यांनी याबाबतचे अनुभव सांगितल्यावर सभागृहाने तो एकमताने संमत केला. अनेकांनी या निर्णयाच स्वागत केलं आहे.