Sambhaji Nagar Crime News : संभाजीनगरच्या (Sambhaji Nagar)  कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी त्यासारखीच दिसणारी पितळाची मूर्ती ठेवण्यात आली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. दोनच दिवसात पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या मूर्तीच्या जागी पितळाची मूर्ती


संभाजीनगरच्या कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ या जैन मंदिरात हा सर्व प्रकार घडला होता. मंदिरात 1 कोटी किमतीची सोन्याची मूर्ती महिन्याभरापूर्वीच बसवण्यात आली होती. सोन्याच्या मूर्तीची चोरी केल्यानंतर त्याजागी हुबेहूब पितळेची मूर्ती ठेवण्यात आली होती. मात्र शनिवारी मूर्तीचा सोन्याचा मुलामा आणि रंग उतरायला लागल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला. यानंतर जैन धर्मियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


परराज्यातून आरोपीला अटक


संभाजीनगरच्या कचनेर मधील जैन मंदिर मूर्ती चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयीत शिष्यानेच ही मूर्ती 15 तारखेला चोरली असल्याचा पुढे आले आहे. आरोपीला परराज्यातून पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दोन किलो सोन्याची भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती चोरली होती तिला वितळवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र हे सगळं सोनं पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे. दोनच दिवसात पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केले आहे.


राजस्थानात बनवली हुबेहुब मूर्ती


कचनेर च्या मूर्ती चोरी प्रकरणात मंदिरातील एक शिष्यानेच हा सगळा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय होता. सौभाग्य सागर महाराज यांच्या शिष्याने ही मूर्ती चोरी केल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक राजस्थान आणि एक मध्य प्रदेशात रवाना झाली होती. चोरी झालेली मूळ 2 किलो सोन्याची मूर्ती राजस्थानातून बनवून आणण्यात आली होती. संशयिताने त्याच कारागिरकडून पितळेची हुबेहुब मूर्ती दुसऱ्या एका मंदिरासाठी पाहिजे म्हणून बनवून घेतली होती. त्यामुळं या शिष्यावर पोलिसांचा संशय बळावला होता. या संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी संशयिक आरोपीला अटक केली आहे. दरम्यान कचनेर हे जैन धर्मियांचे तीर्थ क्षेत्र आहे. या मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त होती.