Jalna Accident On Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. तर या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन कारची समोरा समोर धडक बसून हा अपघात घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं असून 4 जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या आर्टीगा कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर अर्टीगा आणि स्विफ्ट डिझायर या दोन्हीही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कडवंची गावाजवळ ही घटना घडली. यात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय, तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे


या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पण हा अपघात इतका भीषण होता की. दोन्ही कारचा अक्षरक्षा चकनाचुर झाला आहे. 


रात्री अकरा वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या सहा जणांची ओळख पटली आहे. मुंबईतील मालाड भागातील मन्सुरी कुटुंबातील तिघांचा या दुर्दैव घटनेत मृत्यू झाला आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील उमरखेड येथील दोघांचा तर पिंपळगाव बुद्रुक येथील एकाचा मयतांमध्ये समावेश आहे. तर एकाची ओळख अजून पटली नाही, तर या घटनेतील चार गंभीर जखमीवर छत्रपती संभाजीनगरच्या तर एकावर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे मुंबईच्या मन्सुरी या एकाच कुटूंबातील तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून याच कुटूंबातील तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.