नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांची शहापूर तसेच इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी भेट घेतली. समृद्धी महामार्ग जमीन अधिग्रहण अन्यायकारक असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.


शेतकऱ्यांशी चर्चेनंतर काय म्हणाले, राज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली, यात त्यांनी यावेळी प्रकल्पबाधित तसेच इतर शेतकऱ्यांनी देखील या शेतकऱ्यांबरोबर संघर्षासाठी एकत्र येण्याची गरज आहे, दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, तेव्हाच हा महामार्ग रद्द होईल असं सांगितलं.


राज यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं


राज ठाकरे यांनी शांतपणे आमचे मुद्दे ऐकून घेतले, जो माणूस शांतपणे आमच्या समस्या ऐकून घेत आहे, तो निश्चित आमच्यासाठी काही तरी करेन, अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


दहा शेतकऱ्यांचा जिल्ह्यात संघर्ष सुरू


यावेळी राज ठाकरे आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. चर्चेत शेतकऱ्यांनी आपला दहा जिल्ह्यात संघर्ष सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच इतर शेतकऱ्यांकडूनही आम्हाला साथ महत्वाची आहे, मात्र इतर शेतकऱ्यांनी यात हस्तक्षेप करू नये, याविषयी अधिकारी दबाव आणत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.


मुंबईत नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग


समृद्धी महामार्ग हा मुंबईत नागपूर दरम्यान बनवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या जमीनी या प्रकल्पामुळे प्रभावित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.