मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुबंईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे. या आंदोलनाला आता नाशिकच्या समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी पाठिंबा दाखविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाला विरोध करणारे काही शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत धडकलेल्या लाल वादळाला पाठिंबा देत ते आपल्याही मागण्या सरकारी दरबारी मांडणार आहेत. तसेच या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देणार आहेत. 


या समृद्धी बाधित शेतकरी संघर्ष समीतीने सरकारचा निषेध केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हे शेतकरी मुंबईत दाखल झालेल्या लाल वादळात सहभागी होणार आहे.