Mumbai Nagpur Expressway: महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे वेगाने विकसीत होत आहे. 390 गावे आणि 10 जिल्ह्यांतून जाणारा सर्वात मोठा महामार्ग महाराष्ट्रात बनत आहे. या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर हेलिपॅडची देखील व्यवस्था आहे.  एका वेळी 4 हेलिकॉप्टर लँड होतील इतकं मोठं हे हेलिपॅड आहे. या महामार्गामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडणारा आहे.  मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा  महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांतील 390 गावांमधून जाणार आहे. समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 7 तासांत पूर्ण होणार आहे. या मार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.  


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठा टूरीजम प्रोजेक्ट 'नवीन महाबळेश्वर'; 235 गावांचा समावेश करण्याच्या आराखड्याला 100 हरकती


जवळपास  9,900 हेक्टरमध्ये समृद्धी महामार्ग विकसित करण्यात आला आहे. हा द्रुतगती मार्ग 10 जिल्ह्यांतील 392 गावांमधून जाणार आहे, ज्याचा विस्तार भविष्यात आठ लेनपर्यंत केला जाऊ शकतो. एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 16 तासांवरून आठ तासांवर येईल.


महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग


समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांतून जात आहे.  नागपूर, वर्धा, अमरावती आणि इतर जिल्ह्यांना जोडणार आहे. नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे या मार्गाने हे जिल्हे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 अतिरिक्त जिल्ह्यांना देखील जोडला जाणार आहे. 


देशातील मोठा 'ग्रीनफिल्ड' मार्ग 


समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात मोठा 'ग्रीनफिल्ड' मार्ग म्हणून देखील ओळखला जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना 11 लाखांपेक्षा जास्त झाडे लावली जाणार आहेत. या महामार्गावर 65 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज, 6 बोगदे, 189 अंडरपास, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास, 209 अंडरपास असणार आहेत. वन्यजीवांच्या हालचालींसाठी अंडरपास आणि ओव्हरपास  बांधले जाणार आहेत. 


महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना जोडणार


शिर्डी, बीबी का मकबरा, सुला द्राक्ष बाग, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, तानसा वन्यजीव अभयारण्य, पेंच नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणार आहे.  


महामार्गावर मोठा हेलिपॅड


समृद्धी महामार्गावर हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. समृद्धी एक्स्प्रेस वेवर एकाच वेळी चार हेलिकॉप्टर उतरवता येतील.  असलेला भारतातील सर्वात रुंद 17.5 मीटरचा बोगदा आणि महाराष्ट्रातील 8 किलोमीटरचा सर्वात लांब बोगदा  इगतपुरी येथे आहे.