Maharashtra Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज पार पाडले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडले. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा आहे. यामुळं प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केल्यामुळं ७०१ कि.मी पैकी ६२५ कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. संपूर्ण महामार्ग कधी खुला होणार याची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. 


समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. समृद्धी महामार्गामुळं लोकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे तसंच, इंधनाची बचत होणार असून नाशिकच्या विकासात भर पडणार आहे. आज 25 किलोमीटरपर्यंतच्या मार्गाचे लोकार्पण होत आहे. तर, ऑगस्टपर्यंत उर्वरित 76 किमीचे काम पूर्ण होणार आहे, असं दादा भूसे यांनी म्हटलं आहे. 


समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत कधी खुला होणार?


समृद्धी महामार्ग एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. लवकरच 76 किलोमीटरचा टप्पा खुला करण्यात येईल. भिवंडी बायपास अलीकडे शांग्रिला हॉटेल जवळ लोकार्पण होईल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. ऑगस्ट 2024मध्ये समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत खुला करण्यात येईल. 


20 तासांचे अंतर 8 तासांत


एकेकाळी मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत आठ तासात पोहोचणे शक्य होणार. हा मार्ग खुला झाल्याने विदर्भ मराठवाड्याला मुंबईच्या वेशीपर्यंत वाहने जलद गतीने प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये


- इगतपुरी इंटरचेंजचा वापर करुन ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहचता येणार तसेच शेतकऱ्यानाही मुंबईला माल जलदगतीने नेता येणार


- समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा असून एकूण 16 गावातून जाणारा हा रस्ता 24.872 किमी लांबीचा आहे