रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असणार्या विजयनगर येथील कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती १७ एप्रिल पासून मिरजच्या कोविड विशेष रुग्णालयात उपचार घेत होती. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र यात त्यांना यश आले नाही आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीत एक नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला होता. ४७ वर्षीय एका व्यक्तीचा रिपोर्ट करोना पोझेटिव्ह आला होता. कोरोनाबाधित तो रुग्ण मिरजेच्या कोरोना हॉस्पिटल मधील आयसीयूमध्ये दाखल असून तो व्हेंटिलेटरवर होता. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ६ व्यक्तींना आयसोलेशन कक्षात दाखल केलं आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील एक डॉक्टर आणि अन्य २६ अशा एकूण २७ जणांना इनस्टिट्यूट कोरोन्टाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. संपर्कातील अन्य व्यक्तीचा शोध सुरू आहे.


हे वाचा : सांगलीत एक नवीन कोरोनाचा रुग्ण, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं



सांगली जिल्ह्यात यापूर्वी इस्लामपूर मधील २६ कोरोनाचे रुग्ण आढळले होते, त्यापैकी २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर एका महिलेचा रिपोर्ट अजून येणार आहे.