सांगलीत एक नवीन कोरोनाचा रुग्ण, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं

आतापर्यंत सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या २७ वर 

Updated: Apr 19, 2020, 08:29 AM IST
सांगलीत एक नवीन कोरोनाचा रुग्ण, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं  title=

सांगली :  एक नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला असून ४७ वर्षीय एका व्यक्तीचा रिपोर्ट पोझेटिव्ह आला आहे. हा रुग्ण विजयनगर येथील असून तो सांगलीतील एक सहकारी बँकेत कामाला आहे. त्याला त्रास जाणवू लागल्यामुळे, त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, आणि त्याचा रिपोर्ट पोझेटिव्ह आला.रुग्णालयात येण्याअगोदरच त्याला ज्यास्त त्रास जाणवू लागला होता. रूग्ण मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल असून, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहे. दरम्यान त्या व्यक्तीच्या घराजवळचा भाग सील करण्यात आला आहे.

या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वाब सुद्धा तपासणी साठी घेण्यात आले असून, त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी इस्लामपूर मधील २६ कोरोनाचे रुग्ण आढळले होते, त्यापैकी २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर एका महिलेचा रिपोर्ट अजून येणार आहे. तो पर्यंत विजयनगर मधील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून सांगली जिल्ह्यातील एकूण कारोनाचा सँख्या आता पर्यंत २७ झाली आहे.

सांगलीने खूप चांगल्याप्रकारे कोरोनाशी लढा दिल्याचं सांगण्यात येत आहे. २७ पैकी २५ रूग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात सांगलीत अपघात, खून, आत्महत्यांचं प्रमाणही कमी झालं. दर महिना असलेलं मृत्युचं प्रमाण निम्म्यावर आलं. अपघाती मृत्यू कमी झाले आणि आजारही कमी झाले. शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात एरवी असलेली गर्दी आता दिसत नाही. खून आणि आत्महत्यांचं प्रमाणही नेहमीपेक्षा खूपच कमी झालं.