संघर्षाला हवी साथ : भंगार विकणाऱ्याच्या मुलाच्या यशाची ही कहाणी
वडील भंगार गोळा करण्याचं काम करतात... तर आई शेतमजूर आहे... कसंबसं दोन वेळचं जेवण शिजतं... कधीकधी तेही नाही...
निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची... वडील भंगार गोळा करतात तर आई शेतमजूर... अशा प्रतिकूल परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावच्या गणेश चव्हाणनं दहावीच्या परीक्षेत ९३. ६० टक्के गुण मिळवलेत. गणेश नांदगावमध्ये औरंगाबाद रोडवर पत्र्याच्या छोट्याशा घरात राहतो... वडील भंगार गोळा करण्याचं काम करतात... तर आई शेतमजूर आहे...... कसंबसं दोन वेळचं जेवण शिजतं... कधीकधी तेही नाही... अशा खडतर परिस्थितीत गणेशनं दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के मिळवलेत.
गणेशच्या आई वडिलांनी हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करत गणेशला शिकवलं.... पोरानं कष्टाचं चीज केल्यानं आई वडिलांच्या डोळ्यांत आज आनंदाश्रू आहेत.
गणेशमधली गुणवत्ता ओळखून त्याला शिक्षक ईश्वर यादव यांनी त्याची मोफत शिकवणी घेतली.
गणेशला डॉक्टर व्हायचंय. मात्र डॉक्टर होण्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून, हा त्याच्या आई वडिलांसमोरचा मोठा प्रश्न आहे... म्हणूनच गणेशला तुमच्या मदतीचा हात हवा आहे...
परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...
तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा
संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६
पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला,
ए विंग, मॅरेथॉन टॉवर,
लोअर परळ, मुंबई - ४०००१३
ई-मेल : havisaath@gmail.com