सांगली : पोलीस कोठडीत हत्या करण्यात आलेल्या सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 


तपास सीआयडीकडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुन्हा उघड झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी सातशे पानाचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. सव्वाशेहून अधिक जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. 


काय होतं प्रकरण?


पोलीस कोठडीत अमानुष मारहाण केल्यानं अनिकेतचा मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. एवढंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृत्यूदेहही जाळण्याचा प्रयत्न झाला होता.


पोलिसांचा दावा


पोलीस कोठडीत असताना अनिकेतकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मारहाण केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तसंच आणखीन पुरवणी आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता आहे.