रविंद्रा कांबळे, झी मीडिया, सांगली: एसटी आंदोलनामुळे (st strike and protest) सध्या सगळ्याचीच झोप उडालेली असताना एसटी बसच्या अपघातांचेही (st accidents) प्रमाण वाढताना दिसते आहे. अशाच अजून एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे एसटी बस चालकांच्या आरोग्याचा. पंधरा - सोळा तास एसटी बस चालवल्यानं एसटी चालकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून त्यामुळे एसटी बस चालवताना चालकांच्या आरोग्यात काही गडबड झालीच तर त्याचा परिणाम बस चालवताना प्रवाशांवरही (health) होतो आहे. सध्या असाच एक प्रकार घडला असून यांसंबंधी आता चिंता करण्याची वेळ आली असल्याचं पाहायला मिळतं आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना घडली आहे. एस.टी. बस (st news) चालवत असतानाच बस चालकाला अचानक चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसंगावधान राखत बसचं स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केली त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले आहेत. (sangli bus driver faints while driving conductor shows courage and drives bus clams the passengers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा घटना या आधीही घडताना आपण पाहतोच आहोत. सध्या अशा घटनांमुळे बस चालकांना काळजी घेणे बंधनकारक झाले आहे. अनेकदा चालकांना बस चालवताना चक्कर येणे, हृदयविकाराचा (heart) झटका येणे असे प्रकार घडताना दिसतात तेव्हा अशा वेळी एसटी बस चालकांच्या आरोग्याची काळजी हा एक कळीचा मुद्दा ठरतो आहे. 


नक्की काय घडला प्रकार


परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती परंतू ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली. चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले आहेत. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवित भिवघाट येथे आणण्यात आली. सदरच्या चालकावर त्वरीत उपचार करण्यात आले. सध्या बसचा चालक सुखरुप (sangli news) असून या घडलेल्या घटनेने माञ प्रवाशांची मोठी दैना उडाली होती. 


एसटी वाहक काय म्हणाले


कंडक्टर यांनी प्रसंगावधान राखत गाडी भिवघाटमार्गे विट्याकडे आणली. कंडक्टरनं (conductor) धाडस दाखवलं. ते म्हणाले, भिवघाटमार्गात वळणं घेताना चालकांना त्रास झाला. मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. त्यांना चक्कर आल्यानं गाडी वेडीवाकडी होऊ लागली तेव्हा प्रवासीही घाबरले पण त्याचवेळी मी स्टेरिंग हातात घेतला आणि चालकांना बाजूला केलं आणि वळणारी गाडी परत सरळ केली आणि तोपर्यंत प्रवासाही चांगले शांत झाले. घडल्या प्रकारानं सगळीकडूनच कंडक्टरचं कौतुक होत आहे. 


प्रवाशांची अवस्था कशी झाली 


वाहकांच्या प्रसंगावधनामुळं सगळीकडेच त्यांचे कौतुक केले जाते आहे. त्यामुळे प्रवासीही त्यांचे जोरदार कौतुक करत आहेत. प्रवासीही अशावेळी घाबरले होते परंतु चालकाची अवस्थाही त्यांना पाहावली नाही. आजारी चालकाला रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या ते रूग्णालयात (hospital) उपचार घेत आहेत.