सांगली : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार मोहन कदम आणि आमदार सतेज पाटील उपस्थित होते. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. या ठिकाणी राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. पंतगराव कदम यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध होते. तसंच त्यांचं कार्य पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING