मुंबई : एखाद्या कोरोनाग्रस्त रूग्णाला बरं होऊन कधी एकदा कोव्हिड सेंटरमधून बाहेर पडतो असं होतं. मात्र याबाबतीत सांगतील एका रूग्णाची गोष्टच काही गजब आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील हा व्यक्ती कोविड सेंटर सोडायला तयारच नाहीये. कोविड सेंटर सोडण्यासाठी त्याने एक अजबच हट्ट धरलाय. त्याचा हा हट्ट ऐकून सेंटरमधील कर्मचारी देखील पुरते चक्रावले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीतील एक कोरोनामुक्त झालेला व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बरं झाल्यानंतर देखील तो कोविड सेंटर सोडायला तयार नाहीये. चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही असा हट्टच या पठ्ठ्याने धरला आहे.



कोविड सेंटरमध्ये रुग्ण लवकर बरं व्हावे यासाठी त्यांना पोषक आहार दिला जातो. मात्र सांगलीत या पोषक आहाराची चटक एका रुग्णाला लागली. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही हा रुग्ण कोविड सेंटर सोडायला तयार नाही. चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही असा अजब हट्टच या रुग्णाने धरलाय. आणि चिकनसाठी कोविड सेंटरमध्ये नाचायला लागला. इतर रुग्णांनी त्याचा व्हिडिओ काढला.. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.


हा एक प्रकार पलुस इथल्या डॉ. पतंगराव कदम कोविड केअर सेंटरमध्ये पहायला मिळाला. डिस्चार्ज मिळालेला हा रूग्ण चक्क चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर दाखल रूग्णांनी त्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीयो व्हायरल झाला आहे.