Sangli Crime News : धक्कादायक बातमी सांगली जिल्ह्यातून. (Crime News) अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime Latest News) प्रसूतीच्यावेळी अल्ववयीन मुलीचे बाळ मृत अवस्थेत जन्माला आले. त्यानंतर पोलिसांनी पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार  कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेच्या प्रसूतीच्या वेळी तिचे बाळ दगावलेल्या अवस्थेत जन्माला आले. याप्रकरणी मुलीच्या वयाच्याबाबत खातर जमा केल्यानंतर पोलिसात याबाबत माहिती देण्यात आली. अल्पवयीन मुलीचे लग्न केल्याप्रकरणी, जांभूळवाडी येथील अंकुश धायगुडे या पतीवर बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वात धक्कादाय बाब म्हणजे या अगोदर त्या महिलेला एक मुलगा आहे. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळीही ही घटना घडली.


मिरजेतील शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ मृत अवस्थेत जन्माला आले. महिलेच्याबाबत वयाची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. या अल्पवयीन मुलीला या अगोदर एक मुलगा आहे. ती अल्पवयीन असतानाच तिचा बालविवाह करण्यात आला होता. मिरजेत दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी दाखल झाल्यानंतर, प्रसूतीच्या दरम्यान बालक मृत अवस्थेत जन्मला आलं. तिच्या आताच्या 18 वर्ष वयाची खात्री जमा केल्यानंतर ती 14 वर्षाची असताना अल्पवयीन वयात तिचा विवाह झाल्याचे निदर्शनास आले. 


याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलिसात माहिती दिली. पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवून घेतला. याप्रकरणी पती अंकुश धायगुडे याच्या विरोधात बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.