रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: जीव धोक्यात घालून पोलिसांनी हजारो पुरग्रस्तांचे प्राण वाचवले. मात्र २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांची घरही पुराच्या पाण्यात गेली होती. एकीकडे पूरग्रस्तांना वाचवताना खाकी वर्दी पुराच्या पाण्यात भिजत होती. तर दुसरीकडे खाकी वर्दीतील पोलिसांचा संसार मात्र पुराच्या पाण्यात तरंगत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा हे तर सम्पर्ण पुरामध्ये पूरग्रस्त लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत होते. संतप्त झालेल्या सांगलीवाडी येथील लोकांना समजवून त्यांनी शांत तर केलेच, शिवाय तेथील तरुणांच्या मदतीने पूरग्रस्तांना शर्मा यांनी सुखरुप बाहेर काढले. स्वतः एस पी सुहेल शर्मा हे पोहत सांगलीवाडी येथे गेले होते. बोटींच नियोजन करणे, मनुष्यबळ लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे या कामात ते गुंतले होते. सांगलीवाडी, हरिपूर, पत्रकारनगर येथील हजारो जीव वाचवण्यात पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली.


भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आलेले पैसे लाटतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप


जीव धोक्यात घालून पुरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या पोलिसांना पदक मिळावे यासाठी शिफारस करणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.


३३ कोटी वृक्ष लागवडीचं थोतांड, सयाजी शिंदेचे सरकारवर ताशेरे