संजयकाका पाटील यांनी आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं
सांगली जिल्ह्यातील भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तासगावमधली एका कार्यक्रमात भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी आमदार सुरेश खाडे यांना भर सभेत झापलं आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे भाषण सुरू असताना आमदार सुरेश खाडे हे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कानात चर्चा करत बसले होते. यावेळी संतप्त झालेल्या संजयकाका पाटील यांनी सुरेश भाऊ खाडे यांना खडसावले. सुरेश भाऊ, जर माणसं बोलत आहेत, नेत्यांना प्रश्न समजावून सांगू द्या. जरा मेहेरबानी करा, असं बोलत खासदार संजयकाका पाटील यांनी आमदार खाडे यांना खडसावले.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या रोप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये बोलताना संजयकाका पाटील यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी भर सभेतच आमदार सुरेश खाडेंना सुनावलं.