एसटी कंडक्टरने उचलले टोकाचे पाऊल, प्रशासनाच्या भरारी पथकावर गंभीर आरोप
Sangli ST Conductor Sucide: एसटी कंडक्टरने फाशी घेऊन आपले जीवन संपवले.
Sangli ST Conductor Sucide: सांगली येथे एसटी कंटडक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. एसटी कंडक्टरने फाशी घेऊन आपले जीवन संपवले. यानंतर सांगली एसटी आगारात एकच खळबळ उडाली आहे. कसा घडला हा प्रकार? कोण आहे याला कारणीभूत? कोणावर होतायत आरोप? जाणून घेऊया.
भरारी पथकाकडून खोटा गुन्हा दाखल?
दुशांत बुळे असे आत्महत्या केलेल्या कंडक्टरचे नाव आहे. ते पलूस आगाराअंतर्गत वाहक म्हणून काम करत होते. दुशांत बुळे यांनी राहत्या घरामध्ये फास लावून आत्महत्या केली आहे. दुशांत बुळे हे ड्युटीवर असताना प्रवासी वाहतुकीदरम्यान एसटी प्रशासनाचे भरारी पथक आले. त्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात येत आहे.भरारी पथकाकडून दाखल करण्यात येत असलेल्या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यात जाणीवपूर्वक आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मृत बुळे यांनी केला आहे.
एसटी कामगार संघटना आक्रमक
आत्महत्येच्या घटनेनंतर एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. तगुन्हा दाखल झाल्याशिवाय बुळे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
भरारी पथकाच्या तिघांवर निलंबनाची कारवाई
या सर्व प्रकरणानंतर सांगली एसटी आगारचे प्रमुख संजय भोकरे यांच्याकडून घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भरारी पथकाच्या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ट्रायबल फोरम आदिवासी संघटनेचे अध्यक्ष दिलीप आंबवने यांनी झी 24 तासला यासंदर्भात माहिती दिली.