सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी; शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार
सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. शेतकऱ्यांनीच ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
sangola tembhu yojana : सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुनोनी जवळ शेतकऱ्यांनी गेट काढून पाणी वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सांगोला तालुक्यात सध्या टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी टेल टू हेड असे नियोजन केले असताना जूनोनि गावाजवळ काही शेतकऱ्यांनी जेसिबिने स्वतः दरवाजे उघडुन पाणी वळवून आपल्या भागात नेल्याची तक्रार या कालव्यावर टेल भागात अवलंबून आसलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या पूर्वी सुद्धा त्यांनी असे प्रकार केले होते. त्यावेळी त्यांना समज दिली होती. आता मात्र, राजुरी, वाटंबरे, निजामपूर, कारंडेवडी, अकोला , बुरणंगे वाडी, कडलास , सोनंद या गावातील शेतकऱ्यांनी कालव्याची दारे काढणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांना टेल मधील शेतकऱ्यांना पाणी दिल्यानंतर पाणी मिळेल असे सांगूनही या कालव्यातून पाणी पळवा पळवी सुरू आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यावरून सांगोला तालुक्यात पाण्याची पळवा पळवी सुरू असल्याचे दिसत आहे.
पिण्याचे पाणी थेट दारात; शेवाळेवाडीतील महिलांना महिला दिनी अनोखी भेट
पुण्यातील मांजरी येथे दोन हांडे पाणी मिळवण्यासाठी महिलांची होणारी पायपीट, पाणी आल्यानंतर टँकर ते घरापर्यंत आणण्यासाठी होणारा त्रास हे लक्षात घेऊन येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी स्वखर्चाने थेट दारापर्यंत पाण्याची लाईन टाकून महिलांना महिला दिनी अनोखी भेट दिली आहे. शेवाळेवाडी गावातील काही भागांमध्ये गेली अनेक वर्षे पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. रस्ते अरुंद असल्याने पाण्याचे टँकरही या परिसरात जावू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना एक -दोन हांड्यासाठी गावभर पायपीट करावी लागत होती. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ज्या भागात टँकर ही जावू शकत नाहीत. अशी दीडशे ते दोनशे घरे आहेत. या भागाची पाहणी करून राहुल शेवाळे यांनी स्वखर्चाने पाण्याची लाईन टाकून मनपाच्या टँकरद्वारे शेवटच्या टोकाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम केले आहे. याचे समाधान वाटते आहे,अशी भावना शेवाळे यांनी व्यक्त केली.