धुळे : संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. संघटनेत शिथीलता यायला नको म्हणून हा दौरा. कोरोनाच्या काळात लोकांना भेटता आले नाही. मुख्यमंत्री  दिल्लीत जाऊन आले. मुळ प्रश्न बाजुला आणि मिडीयाने वेगळे मुद्दे पुढे आणले. सरकार समजुतीने चालेल. असं त्यांनी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आज नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत असताना त्यावर देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, 'विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव गेला आहे. दि ना पाटील यांच्यासाठी स्वतंत्र काही केले पाहिजे.'


आज नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर सह अनेक ठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी भूमिपूत्रांची मागणी आहे. राज्य सरकारने या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.


मोदी-ठाकरे भेट


चंद्रकांत पाटील गोड, निरागस आहेत. लहान मुलासारखा आनंद घ्यायचा. वाघाने खेळवले आणि लोळवले. वाघ ठरवेल कोणाशी मैत्री करायची की नाही. नाती सदैव टिकतात. प्रत्येक पक्ष स्वतंत्र विलीन झालेले नाहीत. शिवसेना आजही प्रखर हिंदुत्ववादी आहे. सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल.