Sanjay Raut On Sambhaji Nagar Rally: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण शांतता असून शहराला पोलिस छावणीचं स्वरुप आलं आहे. महाविकास आघाडीच्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. अशाचत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा ही होणारच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डॉक्टर मिंधे असा उल्लेख करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.


राऊत काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडी म्हणून ही (संभाजीनगरमधील सभा ही) पहिली सभा आहे. शिवसेनेची खेड आणि मालेगाव या ठिकाणी सभा झाली आहे. महाविकास आघाडीच सभेबाबत वेळापत्रक ठरलं आहे. संभाजी नगर इथली परिस्थिती कशीही असली तरी सभा रद्द होणार नाही असं संजय राऊत म्हणाले. प्रशासन, पोलिसांवर दबाव आणून अटी शर्ती टाकल्या आहेत पण आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही बोलू. या सभेला हजारो लोक विचार ऐकायला येणार आहेत, असंही राऊत म्हणाले. सभा होईल रद्द होणार नाही. ही सभा ऐकायला हजारो लोक येणार आहेत, असंही राऊत नमूद करायला विसरले नाहीत. महाराष्ट्रत गुडीपाडव्याला शोभा यात्रा निघाल्यात त्यावेळी दंगली झाल्या नाहीत. त्यावेळी दगडफेक झाली नाही, राम नवमीला का झाली याचा तपास झाला पाहिजे, असंही राऊथ म्हणाले.


सभेला कोण कोण असणार?


"महाविकास आघाडी म्हणून ही पहिली सभा आहे. शिवसेनेनं खेड आणि मालेगावमध्ये सभा घेतला. उद्धव ठाकरेंनी या सभा घेतल्या. मालेगावची सभा तर ऐतिहासिक होती.  महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घ्याव्यात. त्याचं एक वेळापत्रक ठरलेलं आहे. त्यातली पहिली सभा मराठवाड्यात संभाजीनगरला ठरली आहे. त्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. माझी आताच आंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंबरोबर चर्चा झाली आहे. शिवसेनेनं ही सभा यशस्वी होण्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं आहे. रामनवमीच्या निमित्ताने तिथे दंगल झाली. वातावरणात थोडाफार तणाव असेल. सभेला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे. दंगल सदृष्य परिस्थिती किंवा तणाव निर्माण झाल्याने सभा रद्द होईल या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले या सभेला उपस्थित राहतील. अन्य नेतेही असतील. सभा ठरल्या प्रमाणे होईल. कोणताही बदल त्यात होणार नाही," असं राऊत म्हणाले.


...पण सभा थांबवता येणार नाही


"प्रशासन, पोलिसांवर दाबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पण या देशात अभिव्यक्ती स्वांतत्र्य आणि लोकशाही टीकवणारे आम्ही लोक आहोत. जे आम्हाला बोलायचं आहे ते बोलावं लागेल. जाहीर सभा आहे. आमचे विचार ऐकायला लोक येतील. आमचे नेते बोलतील. त्यातून काही आक्षेपार्ह वाटलं तर त्यावर नंतर चर्चा करता येईल. पण कोणालाही सभा थांबवता येणार नाही," असं राऊत यांनी म्हटलं.


डॉक्टर मिंधे आणि फडणवीस...


"सभा होत आहेत म्हणून डॉक्टर मिंधे आणि श्री फडणवीस यांच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. थरथरत आहेत. सभेचे आयोजक आहेत त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. तणाव निर्माण करण्याचं वातावरण महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न आहे," असं म्हणत राऊत यांनी थेट राज्य सरकारला लक्ष्य केलं.



बावनकुळेंना टोला...


राऊत यांचं संभाजीनगर दंगलीसंदर्भातील विधान चिथावणी देणारं असल्याच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरही राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली. "बावनकुळे काय म्हणतात यावर राज्य चालत नाहीत त्यांचा पक्ष चालत नाही. देशभरात दंगल झाली. पश्चिम बंगाल, राजस्थान, महराष्ट्रात दंगली झाल्या. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पुन्हा सत्ता मिळवायची आहे," असं म्हणत राऊत यांनी भाजपावर टीका केली. संभाजीनगरमधील तणावासंदर्भात बोलताना, काड्या करण्याचं काम मिंधे गट करत आहे. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचाही हात आहे असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.