कोल्हापूर : छत्रपती शाहू ( Chatrapati Shahu ) यांनी संभाजीराजे ( Sambhajiraje ) यांनी 'अपक्ष' लढावं ही फडणवीसांची ( Devendra Fadnavis ) खेळी होती. त्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे यांनी 'स्वराज्य' ( Swarajya ) संघटना काढली असा गौप्यस्फोट केला. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शाहू महाराज यांचे आभार मानताना कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्याने सत्याची कास सोडली नाही, असं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनं ( Shivsena ) कधीही कोणाची फसवणूक केली नाही हे स्वतः शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackarey ) यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जी विधाने केली. ठरवून कोंडी केली ते विधान किती खोटे होते. ते आज शाहू छत्रपती ( Shahu Chtarpati ) यांनी स्पष्ट केले याबद्दल त्यांचे आभार असे राऊत म्हणाले. 


शाहू महाराज यांचा अनुभव अधिक दांडगा आहे. छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ( Balasaheb Thackarey ) यांचा निकटचा संबंध होता. काही लोकांनी पेटवापेटवीची भाषा केली. पण, शिवसेनेने कधीही राज्यसभेच्या उमेदवारीच्या त्या प्रकरणात खालच्या पातळीवरचे राजकारण केले नाही. 


राज्यसभेची सहावी जागा आमची होती आणि तसा प्रस्ताव आम्ही संभाजीराजे यांच्यापुढे ठेवला होता. परंतु, त्यांना पुढे करून फडणवीस यांनी एक वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा डाव नव्हता तर ते कपट होते.


फडणवीस यांचे हे कपट शाहू महाराज यांनी पुढे आणले. सचोट आणि प्रामाणिकपणा यामुळेच महाराष्ट्र शाहू घराण्यापुढे झुकतो. सत्याची कास, सचोटी आणि प्रामाणिकपणा तसेच ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येते तेव्हा शाहू घराणे पुढे येते याचा पुन्हा प्रत्यय आला असे राऊत म्हणाले.