नाशिक : खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच मंदिर दर्शनासाठी २१ ते २७ जून दरम्यान बंद राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवती मंदिर परिसरातल्या परतीच्या मार्गावर काही दिवसांपूर्वी दरड कोसळून तिथल्या संरक्षक जाळीत मोठमोठे दगड अडकले होते. 


संरक्षित जाळीत अडकलेले ते दगड काढण्याच्या कामात कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून बुधवार २१ जूनपासून सलग सात दिवस म्हणजे २७ जूनपर्यंत सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं जाणार आहे.