शिर्डी : सरपंच यांचे मानधन पाचशे रुपयांवरून थेट पाच हजार रुपये करण्यात आले आहे. शिर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. मानधन वाढ हा ट्रेलर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सरपंचांची मानधन वाढ हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आणखी महत्वाचे निर्णय घेणार असल्याचे सूचीत केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीमध्ये ४७ हजार सरपंच आणि उपसरपंचाची परिषद पार पडली. सरपंचांसाठीचं मानधन पाचशे रुपयांवरुन थेट पाच हजार करण्यात आले आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,  पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. सगळ्यांनाच आमदार व्हायचंय, पण थोडी सबुरी ठेवा, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.