COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा : महाबळेश्वरला नवदाम्पत्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात आंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पाचगणीच्या पसरणी घाटात ही घटना घडलीये.


आनंद कांबळे त्यांच्या पत्नीसह फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेले होते. त्यांच्या सोबत आणखी एक जोडपं होतं. वाई येथून पाचगणीच्या पसरणी घाटातून जात असलाना वाटेत गाडी थांबवल्यानंतर हल्लेखोरांनी आनंद कांबळे यांच्या पत्नी दिक्षा हिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.


यावेळी चोरट्यांना रोखण्यासाठी गेलेल्या आनंद यांच्यावर चोरट्यांनी चाकूनं हल्ला केला. यात आनंद यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी दिक्षा किरकोळ जखमी झाली. पोलिसांना या घटनेची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांच्या तपासासाठी तीन पथकं तैनात केलीत.