सातारच्या कैलास काशीदच्या `हेअर स्टाईल`चा भारतात दबदबा
कैलास काशीदला तुम्ही कोणतीही केशरचना सांगा. कात्री आणि कंगव्याच्या आधारे तो तुमच्या डोक्यावर उत्कृष्ट कला सादर कर
विकास भोसले, झी मीडिया, सातारा: कैलास काशीद या अवलियाने कट हेअर डिझाईन क्षेत्रात देशभरात दबदबा निर्माण केलाय. अखिल भारतीय केशरचना स्पर्धेत त्याने देशात पहिला क्रमांक पटकावलाय. आता मलेशिया इथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी तो तयारी करतोय. कैलास काशीदला तुम्ही कोणतीही केशरचना सांगा. कात्री आणि कंगव्याच्या आधारे तो तुमच्या डोक्यावर उत्कृष्ट कला सादर करतो.
हेअरस्टाईलसाठी तरूणांची अक्षरशः रांग
कैलासचं कराडमध्ये केश कर्तनालय आहे. त्याच्याकडे तरूणांची अक्षरशः रांग लागलेली असते. अखिल भारतीय केशरचना स्पर्धेत त्याने देशात पहिला क्रमांक पटकवलाय. तो आता मलेशिया इथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तयारी करतोय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ताजमहाल, अभिनेता अजय देवगण, सलमान खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या प्रतिमा त्याने तयार केल्या आहेत.
कला जोपासता आली पाहिजे
व्यवसाय कोणताही असो त्यात कला जोपासता आली पाहिजे. आता मलेशियात त्याचा जागतिक पातळीवरच्या कलाकारांशी सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी कैलासला शुभेच्छा