Crime News : साताऱ्यात (Satara News) मध्यरात्री व्यावसायिकाच्या झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. सातारा शहरातील सातारा - पुणे महामार्गाजवळील (Satara - Pune highway) वाढे फाटा येथील एका हॉटेल परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. अज्ञातांनी हॉटेलमध्ये आलेल्या एका व्यासायिकावर गोळीबार (Firing) करत त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. अमित भोसले असे मृत व्यावसायिकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी (Satara Police) आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. मध्यरात्री घडलेल्या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अज्ञातांनी झाडल्या चार गोळ्या


सातारा - पुणे महामार्गाजवळील वाढे फाट्याजवळ अनेक छोटी मोठी हॉटेल आहेत. मध्यरात्रीपर्यंत जेवणाची हॉटेल सुरु असतात. शुक्रवार पेठेत राहणारे व्यावसायिक अमित भोसले हे मध्यरात्री 1 वाजता हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. गाडीत बसून नाष्टा केल्यानंतर हात धुवत असताना दोन हल्लेखोरांनी अमित भोसले यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या अमित भोसले यांच्या दिशेने चालवल्या. यामध्ये अमित भोसले यांच्या डोक्यातही गोळी घुसली. यामध्ये भोसले यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


हॉटेल व्यवसायातून हत्या?


अमित भोसले यांच्यावर गोळीबार करत हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या गोळीबाराचे नेमकं कारण अद्याप समोर आले आहे. अमित भोसले यांचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे अमित भोसले यांच्या हत्येनंतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावर असणाऱ्या वाढे फाट्याजळ दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. त्यातूनच ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.


दरम्यान, याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. तर दुसरीकडे अधिक तपासासाठी पोलिसांची 10 पथके रवाना करण्यात आली आहेत.